आयुष्याचा जमा खर्च एवढा का सोपा
किती सारी खाती अन केवढा तो खोपा
धंद्याचे म्हणाल तर अजूनही करतोय विचार
यातच तुझा आनंद की उगाच मारतोय थापा
चार नवीन गोष्टींची केली आहे सुरुवात
दोन मजल दर मजलात प्रगती कशी नापा
चार सहा मित्रांची केली आहे जमवाजमव
महिन्यातून एकदा तरी होतात छान गप्पा
मुलांबरोबर आजकाल मन फारच ओढावे
बायको म्हणती "पोरे ती पोरे अन नवरा, बाप्पा बाप्पा!"
माता पित्यांची अधून मधून होत असते भेट
प्रेम मायेच्या बरसातित येतेच की "जरा जिवाला जपा"
गणगोतात रोजच रंगतो ई-गप्पांचा कट्टा
भव्य आंतरजालात हा माझा आवडता कप्पा
पत्नी प्रिया सखी सुरभि आशा अपेक्षा अन मनिषा
संसारगाडा म्हणजे झप्पी, धप्पा अन पुन्हा हाडेल हप्पा
को हम, कोण मी प्रश्न आजकाल घाली पिंगा
उत्तराच्या शोधात पळतोय, टाकतोय धापा
एवढे हे अवघड नसावे, नक्कीच सापडेल गुरुकिल्ली
थोडे आध्यात्म, थोडी भक्ति, थोड़ा धीर नक्कीच करेल मोक्ष सोपा