शनिवार, २५ एप्रिल, २०२०

भक्ती


ऐसा क्यूँ लग रहा है कि तेरे पास आ रहा हूँ मै 

जम गया बदन जमे हुए कदम फिर भी उड़ रहा हूँ मैं


                तुझे पाने की आह है ना तुझे हासिल करने की चाह

                दिल मे बसे तेरे एहसास को लेकर कामिल हो रहा हूँ मैं 


कितनी माँगे और बची है, कितना है मन्नतों का तकाजा

तेरी नजर-ए-दुआओं में सुकून से सो रहा हूँ मैं


                बहती रहे तुम्हारे आरजू की हवाएं मेरे ख़यालों-ए-बगीचे मे 

                ऐसी फ़िज़ा की बनी जन्नत में करवटें लेता रहा हूँ मैं


जानता है राहुल की जिंदगियां दूरी पर ही चलती रहेंगी 

तेरे दीदार से सजे हर लम्हें को जिंदगी कर जी रहा हूँ मैं 


मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

झुणका एयरलाइन्स

 

गंगीन मला दरवाजातून आत गेल्या गेल्या मोठ्ठा नमस्कार घातला.

"या साहेब. तुमी पाहिल्या धारे वाले. कुट बी बसा." अस म्हणुन ती पुढच्या प्रवाश्यांला नमस्कार घालायला गेली. पाहिल्या धारे वाले हे झेपायला मला वेळ लागला. मी “झुणक्याचे” चे श्रीमंत क्लास चे तिकिट काढले होते म्हणुन मला ही ट्रीटमेंट. मी दुसर्‍या रांगेत, विमानातल्या मधल्या बोळाच्या बाजूने बसलो.

काही क्षणातच एक भला मोठा पसारा डुलत डुलत आला. नेमकी त्याची सीट माझ्या बाजूला. आता हे धूड आत कसे जाणार याची चिंता करत त्याला आत जाऊ देण्यासाठी मी उठलो. तेवढ्यात गंगी आली अन तिने त्या पसाऱ्याला आपण जस गच्चं भरलेल्या कपाटात, जागा नसतांना कपडे कोंबतो तसे अक्षरशः कोंबले अन त्या एवढ्याशा जागेत, जी जागा सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य आकारा पेक्षा सर्वसामान्यपणे तीन चतुर्थांश एवढी होती त्या "सीटा" वर हा चार एक्सएल साईझ चा पसारा कसा बसणार हि माझी चिंता दूर झाली. गंगी पुढच्या पासेंजरला नमस्कार घालायला गेली. मी विचार केला जेनो काम तेनो थाये अन माझ्या सीटा वर जाऊन बसलो अर्थात त्या बारदानाचे उतू माझ्या सिटावर ओघळले होते, पण मी  सावरून कसाबसा माझ्या स्वतःच्या श्रीमंत क्लास च्या ऐसपैस जागेत उंदीर कोपऱ्यात घाबरून बसल्या सारखा बसलो होतो. मी विमानाच्या मधल्या बोळाच्या बाजूने, मध्ये एक जागा त्यात हे रानकमळाच फूल आणि सध्या मला बिलकुलच दिसत नसलेली खिडकी जवळची जागा असे एकंदर विमानातल जागा वाटप होत. 


विद्यमान सरकारनं आपल्या जनतेच्या भल्या पोटी आणि आवागमन जलद व स्वस्त व्हावे या दृष्टिकोनातून "बस सोडा विमान पकडा" अशी योजना काही महिन्यांपूर्वी लागू केली होती. या योजनेनुसार लालपरीच्या किमतीत विमान प्रवास शक्य केला होता. यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात अक्षरशः औरंगाबाद - मुंबई दरम्यान टपरात डब्बे रखडत रखडत चालवणाऱ्या दादा-ताईंची भरती झाली होती. या भाऊ गर्दीत आंतरवालीच्या राहुलराव देशमुखांनी आपली शेतीवाडी विकून झुणका एयरलाईन्स सेवा तीनेक महिन्यांपूर्वी सुरु केली होती. पाश्चात्य देशातल्या छोट्या, जुन्या त्यामानाने सर्वसाधारण किमतीत मिळणाऱ्या (शिवाय सरकारची सबसिडी होतीच की) चार दोन विमानाच्या ताफ्यावर राहुलरावांनी हा डोलारा उभा केला होता. राहुलरावांच्या पाचोड ते अडुळ व्हाया कडेठाण - आंतरवाली - आडगाव टेम्पोट्रॅक्स सेवेला फाटा मारून हे नवीन एयरलाईन चे खूळ सुरु झाले होते. सबसिडी असल्यामुळे कमाई चांगली होण्याची शक्यता होती आणि लवकर धंद्याला सुरुवात केल्यावर जास्त भाडी आपल्याला मिळत रहातील अशा काहीशा हेतूने राहुलराव या नव्या धंद्यात पडले. त्यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवणाऱ्या किस्न्या अन म्हमद्या ला त्यांनी फ्लाईट सिम्युलेटर ची शिकवण दिली आणि एक-एक चाळीस शिटर उडवायला दिले. सुरुवातीला दोन तीन आठवडे कोणी प्रवासी इमानात बसायला तयार होत नसे, अर्थात भीती पोटी पण राहुलरावां सारख्या बाकीच्या इमान ऑपेरेटर्सनी आपापल्या टेम्पोट्रॅक्स बंदच केल्यामुळे प्रवांशाना काहीच पर्याय उरला नाही आणि सीटं भरता भरता भरत गेली. किस्न्या म्हमद्याची इमानं कधी थोडी जास्त वर तर कधी जरा जास्तच खाली उडता उडता बरोबर उडायला लागली व राहुलरावां झुणका एयरलाइन्स ला सूर गवसला. 

पाटलांच्या गंगीला नट्ट्याफट्ट्याची आणि वायफळ बडबड करण्याची फार हौस अन तिच्या बरोबर ती कायम फिरणारी सुमी अशा दोघींना राहुलरावां च्या झुणका एरलाईन्सनी हेरले आणि दोन विमानाच्या दोन "एयार हास्टेस" करून टाकले. 

सरकारची "बस सोडा विमान पकडा" योजना फारच सक्सेसफुल झालेली दिसत होती. 


माझ्या विचारांची तंद्री एका शिडशिडीत आक्कान भंग केली. 

"सायेब, जरा सरकून घ्या." 

"अहो, सरकायला जागा आहे कुठे?" मी. 

तोपर्यंत माझ्या बाजूच्या रानकमळाने मैफल सुरू करून खर्जातला सा लावला होता. मी त्या आक्कीला माझी हतबलता बाजूच्या सीटा कडे हात करून दाखवली. तिचा पारा चढला… 

"ए रताळ्या, लई नखर नग करू. ही मपली जागा हायी… उठ अन व्हय तिकड" एवढे बोलून तिने गंगीला आवाज दिला. "गंगे, ए गंगे. ह्यो सायबा वानी दिसनारा घुबडाच्या वानाचा टग्या उठीव हीतन, नाय तर मपले पैके दी परतीन ." 

गंगी धावतच आली. 

"वो सायेब, धंद्याच्या टायमाला खिटखीट करू नगासा" गंगी. 

तेव्हढ्यात माझ्या बाजूच्या बारदानाची मैफल कोलमडली व तो जागा झाला "अस दुसर्‍याच्या सीटावर कोन बसतय व्हय? दिसायला शिकले सवरलेले दिसता, अस वागन शोभतय व्हय लेका?" तेवढ्याच खोल व गंभीर आवाजात तो मला म्हणाला. 

"अहो पण तुम्हीच मला बसवले ना इथे." मी त्याचे ऐकून न ऐकल्या सारखे केले व गंगीला म्हणालो. 

"आत्ता ग बया म्या बसील व्हय तुमाला. इसरलेच बगा मी. " अस म्हणुन ती खो खो हसली. 

ह्या इमानातून आता पायउतार व्हावे लागते की काय असे मला वाटायला लागले. 

तो पर्यंत गंगीन मॅटर हातात घेतला व ती त्या आक्कीला लाडीगोडी लावत इमानात मागील बाजूस घेउन गेली. "अग मावशे, त्यो सायेब शहरातला दिसला म्हनून लागली तू त्याला शा द्यायला. अस नसतय ना. चल म्या तुपल्याला एक मस्त शीट देते" मला जरा हायसे वाटले. 


माझ्या बाजूचा नग सारवासारव करत "सायेब, सारी झाली बरका. अहो, ही शहरची लोक येत्यात अन लई तरास देतात बगा, काय सांगू मी तुमाला. बर कुठल म्हने तुमी पावनं?" 

मी काही बोलणार तेवढ्यात त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली, "आता परवाशाला बगा योक मोटा शहराचा ढंप्या आला हुता. म्या आडूळाला चाल्लो व्हतो. गंगीन त्याला म्हमद्याच्या बाजुला बशिला." मला न समजल्याने मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्या कडे बघितले. त्यावर तो म्हणाला "म्हमद्या ओ… आपल्या ईमानाचा डायवर." हे ऐकून मी एक भला मोठा आवंढा गिळला. "ऐका ना, तर त्यो सायेब म्हमद्याच्या बाजूला बसला. आता बसला तर बसला गप बसावं ना… पर त्यो उगा हिकडच बटान दाब तिकाडचं दाब असल काई बी करायला. अन म्हमद्या ला कळाय च्या आत ईमान उडल ना भो… अरा रा असला राडा झाला न मंग काय सांगू तुम्हास नी. अख्ख ईमान घुसल रंग्या च्या शेतात. त्याच पन्नास एक जनावर येड्यावाणी पुर्‍या गावात घुसलं, अख्खी बाजर गेली गड्याची अन ती शेवंता हाये ना… " माझे पुन्हा प्रश्नचिन्ह… "ती नाय का आत्ता आली हुती भांडायला अन तुम्हाला उटवायला ती" मी समजल्या सारखे केले "ती बी हूती ईमानात अन ते ईमान जवा म्हनुन का वाकड तिकड उतरल, शेवंता लगी छपरा ला भिडली. तवा पास्न बगा शहर वाला बाबा दिसला की लई डोस्क फिरतया तिच " त्याची कहाणी एकदाची संपली मी काही बोललो नाही पण माझे धाबे दणाणले होते की इथ असे पण काही होऊ शकते. मी आपला भीमरूपी चा धावा सुरू केला मनातल्या मनात. 

माझ्या बाजूच्या नगा ने अजून एक दोन स्टोर्या हानल्या अन तेवढ्यात अनाउन्समेंट सुरू व्हायच्या आधीची खरखर झाली, त्यानंतर 


"असलाम वालेंकुम… 

म्या तुपला पायालाट बोलरा. आपन आता लगीच निघून राहिलो. आपापल्या टोपल्या, थैल्या, बॅगी, सांभाळून ठिवा. मागल्या दोन तीन येळेला सामान बदाबदा पडल हुत अन बायाबापड्यांची टकूरं फुटली हुती. आसं जर का झाल तर झुणका पैसे देनार न्हाई अन ज्याच्या कून तेच सामान पडन तेला भरून द्याव लागन. आधीच सांगुन ठिवतो. शाम्याचा बैल बोळीत परापरा हागलाय. तिवढ साफ झालका की आपुन निघू."

"सुमे, गंगे, आवरा पटापट. अन् घ्या वढून ते कवाड". 

असे म्हणुन निघायची तयारी सुरू झाली. विमानाचे इंजिन सुरू झाले (मला आधी वाटले की विहिरीवर चा पंप सुरू झाला की काय), पोरींनी फराफरा बोळ बोळ साफ केली. 

बैल, बकऱ्या, कोंबड्यांच्या टोपल्या सगळे विमानाच्या मागच्या बाजूला होते, तिथे खास जागा केल्या होत्या. मधूनच एखादी बकरी आवाज करे, म्हैस हंबरे असे प्रकार चालू होते. 


शेवटी एकदाचे विमान हलले. धावपट्टी वर जाण्याचा रस्ता पकडण्याआधी विमान मागे मागे चालले होते तेवढ्यात आपण सायकलवर बसुन जाताना एखादा खड्डा कसा नको त्या जागी गच्चकन बसतो तसं काहीस झाल आणि मी दणाणलो. माझ्या खुर्चीत जवळजवळ उठूनच उभा राहिलो. माझी ती पाचावर बसलेली धारण बघून माझ्या बाजूच्या ला दया आली. "घाबरू नगा सा तात्या. केकताड आल आसन टायरा खाली." हे ऐकून बरे वाटायच्या ऐवजी मला आणखी घाम फुटला. भीमरूपी आता मोठ्याने सुरू झाली. थोडे पुढे गेल्यावर विमानाच्या पंखांना काहीतरी लागले असे वाटले. माझा नवखेपणा, भेदरलेले डोळे बघून मी बोलायच्या आत बाजूचा “कडूनिंबाची मोप झाडं हायेति हिथं.  एखाद घासलं आसन!” पुढे बसणाऱ्या प्रत्येक दणक्याला, बाहेरून येणाऱ्या विमानाच्या पत्र्याचा आवाजाला त्या नगान साजेशी अन माझ्या हृदयाच्या थरकाप उडवणारी उत्तरे दिली. 

आता मला विमानाच्या इंजिनचा आवाज येत नव्हता कारण माझे हृदयच एवढ्या जोरात धडधडत होते कि मी सुन्न झालो.


विमान आता धावपट्टीवर होते… माझी गात्रे माझे  काहीही ऐकायला तयार नव्हती, माझ्या खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडून मी आता पुढे काय वाढून ठेवलेले आहे आणि त्यांनी माझे धडधडणारे हृदय शरीरातुन बाहेर उड्डाण करणार कि काय याच एकमेव चिंतेत मी बसून होतो. एक मात्र आहे, माणसाला जेव्हा लक्षात येते कि तो अत्यंत अवघड कचाट्यात सापडला आहे तेंव्हा शरीरातील पेशी न पेशी दिग्मूढ होऊन पुढल्या संकटाची चाहूल घेते. प्रत्येक क्षण एकतर दुधारी तलवार होतो नाहीतर तो क्षण जर  कुठलाही मोठा धक्का न देता पुढे गेला तर तो हुरुपात भर घालतो. 

एव्हाना मागील पूर्ण दोन मिनिटे विमान अत्यंत व्यवस्थित पुढे जाते आहे असे बघून मला थोडे हायसे वाटते न वाटते तोच विमानाने अचानक वेग घेतला. त्या झटक्या सरशी माझी क्षणिक चेपलेली भीड़ वार्‍याच्या वेगाने आसमंतात उडाली. म्हंटले आता काही खरे नाही हे लोक विमान सोडून बुंग उडवतील अन ते जाईल वार्‍याच्या दिशेने… आता मी झुणका च्या नावाने ठणाणा सुरू केला "युजलेस, असे कोणी विमान फ्लाय करतात का? ओह गॉड सेव्ह मी रे बाबा"....

माझा तोंडाचा पट्टा चालू होता. माझ्या बाजूचा नग कधी स्वतःशी पुटपुटत होता तर कधी मला उद्देशून "शहर चे येडे, नाचता येईना अंगण वाकडे. विमानात पहिल्यांदाच बसलाय जनू…. ते बी माह्या बाजूला" अशा एकावर एक शिव्या, स्वगतं वगैरे ची माझ्यावर उधळण करत होता. एकंदर माझे कधी गलितगात्र तर कधी रौद्ररुप पाहून तो पण तसा हवालदील झाला होता, कोण्या शहरी ने अश्या अनुभवांना घाबरून चालत्या विमानाचा दरवाजा उघडण्याची गोष्ट त्याने मला काही वेळापूर्वी सांगितली होती अन मी हि आता एक घाबरलेला शहरी असल्यामुळे व मधुन मधुन दरवाजा कडे बघत असल्याने तो पुरता घाबरला होता. त्या वाढलेल्या वेगाने पुढे जाणार्‍या इमानाला अचानक फेफरं आल पुढील भाग उचलतो ना उचलतो तोच बदकन खाली बसला व हवेत फेकल्या सारखा उडाला. त्याच बरोबर इमानाच्या मागच्या भागाने देखील पुढला उडला मी का खाली बसू म्हणुन मिशीवरून ताव मारला अन तावासरशी हवेत उडी मारली. इमानात या सगळ्या प्रकाराचा फारसा कुणाला फरक पडलाय असे वाटत नव्हते; हां सगळे मात्र आपापल्या सीटाला गच्च धरून बसले होते. विमानात शिरतांना प्रत्येक जण आपल्या सीटाला पट्टा आहे की नाही ते आणि असल्यास पक्का आहे की नाही ते तपासून पहात होते. हे पाहत असताना क्षणभर का होईना पण मला सगळे खूप सुरक्षेच्या बाबतीत जागरूक आहेत असे वाटते होते. पण या घडीला कळाले की पट्टा का एवढा महत्वाचा होता ते. 

एव्हाना माझा पट्टा थोडा सैल असल्याने माझे टाळके छपराला दोनदा आपटले होते व किमान एक भले मोठे टेंगूळ डोक्यावरील नसलेल्या केसातून डोकावू पहात होते. आधीच घाबरलेला मी वर हे दोन दणके खाऊन पुरता रडकुंडीला आलो होतो आणि भोकाड ताणणार तोच सगळीकडे अचानक शांतता पसरल्याचा भास झाला. आपण मरून स्वर्गात (किंवा नरकात) पोहोचलो आहोत आणि म्हणुन एकदम सारे शांत झाले अशी भावना मला झाली आणि कुटुंबाच्या कल्पनेने मी पुरता व्याकुळ झालो. 

तेवढ्यात बाजूचा पसारा… "झाल तात्या, थोडा धीर धरला असता तर टकुरं फुटलं नसत ना. उगा येड्या वानी करत हुता. जरा दमानं घ्यायाच. शहरच शिकलेल ना तुमी."

त्याला उत्तर द्यायचा काहीही मानस नव्हता माझा. तिकडून गंगी आली. मी तिच्याकडे "आता जगण्यातच काही शिल्लक नाही तर बोलण्यात काय" अशा काही अविर्भावात बघितले. 

"सायेब, हे घिवा"

मी फक्त पुन्हा भुवया वर करून क्षीण प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडे पाहिले… 

"जूस हाय" 

मी पुढे काही भाव बदलण्याच्या आत "उसाच जूस" असे म्हणुन निघून गेली. 

मी तो रस गटागटा पिला. थोडी तरतरी येती ना येती तोच विमानाच्या खालच्या बाजूला काहीतरी निखळून सुटल्याचा आवाज आला. चेहर्‍यावरील भाव बदलले. अत्यंत भेदरलेल्या नजरेने मी बाजूच्या कडे बघितले… 

"अडुळ आलना तात्या" असे म्हणुन तो खदाखदा हसला. 

सुटकेचा निश्वास सोडावा की ढसाढसा रडावे या अशा "to be or not to be" मध्ये मी अडकलो. बुद्धी हवालदिल झाल्यावर बाकीच्या अवयवांना बुद्धी येत असावी बहुधा कारण नकळत पणे मी पट्टा करकचून आवळला होता पण मन मात्र सैरभैर झाले होते. 


जर विमान उड्डाणाला माझी अशी अवस्था झाली तर उतरताना दहा टेंगळ अजून निघतील असा धसका माझ्या जीवाने घेतला, का व कसा माहीत नाही. 

त्याचा परिणाम मात्र जबरदस्त झाला.  मन जीवावर उदार झालो आणि बाजीराव पेशव्यांच्या सेनापती सारखा आवेग अंगात संचारू लागला. नसानसात स्फुरण चढले. मला एकच लक्ष्य दिसत होते दरवाजा! 

"मी दिल्ली दरवाजा भेदतो, तुम्ही गडाला वेढा घाला" अशी डरकाळी फोडून मी जागेवरून उठायला लागलो पण पट्टा कसलेला होता. माझे भान पुरते गेले होते मला वाटले की शत्रूच्या साखळदंडा चा फास माझ्या कमरे भोवती अडकला आहे. आत्यंतिक त्वेषाने हर हर महादेव ची घोषणा करत मी पट्टा तोडला. आदळत आपटत मी दरवाजा जवळ पोहोचलो तर गंगी व सुमी दरवाजाशी खटपट करत होत्या मला वाटले शत्रूने मला वेढा घातला… पुन्हा एकदा मी हर हर महादेव ची घोषणा केली. यावेळी माझा आवेश बघून व आवाज ऐकून दोघी घाबरून बाजूला झाल्या. दिल्ली दरवाजा भेदायचा या एकमेव उद्देशाने मी दोन्ही हात सरळ करून दरवाजा वर झेप घेतली… 


पण… पण पोरींच्या खटपटीत दरवाजा आधीच उघडला होता माझ्या निव्वळ छोट्या धक्क्यसरशी दरवाजा दाणकन खाली गेला व दरवाजाच्या वर असलेल्या पायर्‍या आपोआप उघडल्या…


मी एवढा जोरात होतो की माझा पाय घसरला व कपाळमोक्ष का काय म्हणतात ना ते झाल. 


आज दोन महिने होत आले आहेत दोन पायांचे व हाताचे फ्रॅक्चर निघाले आहे पण एका हाताचे बाकी आहे. आणि हो डेंटिस्ट कवळीचे माप घेऊन गेली आहे… पंधरा दिवसात देते म्हणाली नवीन दात! 

तोपर्यंत लिक्विड डाएट आणि मनसोक्त टीव्ही. 

(फक्त झुणका एयरलाइन्स ची जाहिरात सोडून हां)


गुण्डाराज

यह क्या हो रहा है आजकल  गुस्ताख़ी राजाओंकी की बढ़ रही है पल पल  देश को चलायेंगे सोचकर सिर पे बिठाया था कम्बख्तोने आसमान में भर दिया काजल कैसे ...