प्रत्येकाची खबर घेतो, काढतो चोपून
उपयोग काय त्याला माझ्याच गाथा सांगून
काय वाटले तुम्हाला तो घेईल ऐकून?
पूर्वीपासूनच बनला असा तो माझेच ऐकून
आता काय विचारताय, बसलाय चांगलाच सोकून
मीच शिकविले त्याला म्हणुन तोच बसतो बोलून
त्याच्या वाक़चातुर्या मुळे कोणीच बोलत नाही समोर येऊन
तोच आजकाल सगळे करतो पुढे सरसावून
एवढा आवेशात येतो कधी तो, मी मागेच थांबतो भिऊन
माझाच मित्र तो कसा जाईन मी घाबरून
वाटतोय तो मिरे माझ्याच डोक्यावर बसून
मदत हवी का मला? तर तो विचारतो का म्हणून
एकटा पडलो मी असा! तर तो म्हणतो काय पाहिजे अजून
आता मात्र अवघड आहे, गात्रे बसली थकून
पण… पण ताठ उभा आहे तो राहुलला मसणात पोहोचवून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा